Published On : Fri, May 7th, 2021

बसपा ने छत्रपती शाहुंना अभिवादन केले

Advertisement

नागपुर – आरक्षणाचे जनक बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांचा 99 वा स्मृतिदिन दक्षिण नागपूर बसपाचे जनसंपर्क कार्यालय व मान्यवर कांशीरामजी सार्वजनीक वाचनालय न्यू कैलास नगर नागपूर येथे छत्रपती शाहू महाराजांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

स्मृतिदिन अभिवादन समारोह व ग्राफिन वर्ड ह्या साप्ताहिकाचा लोकार्पण समारोह महाराष्ट्र प्रदेश बसपा चे कार्यालयीन सचीव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी नागोराव जयकर व ग्राफिन वर्ड चे संपादक प्रवीण पाटील ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पार पडला.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रसंगी युवा नेते चंद्रशेखर कांबळे, दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभाचे अध्यक्ष सदानंद जामगडे, मध्य नागपूर विधानसभाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी जिल्हा महासचिव सहदेव पिललेवान, दक्षिण नागपुर विधानसभा चे प्रभारी शंकर थुल, सिद्धार्थ सोनटक्के, संभाजी लोखंडे, विलास मून, अरुण शेवडे, सुमित जांभूळकर, विद्यार्थी शेवडे, जगदीश गेडाम, शामराव तिरपुडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यापूर्वी राज्यात बसपा चे जे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर आदी मानवतावादी व परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय असलेल्यांचे यापूर्वी निधन झाले त्या सर्वांना सामूहिक शोक संवेदना व्यक्त करुन आदरांजली व्यक्त करण्यात आली.

उत्तम शेवडे नागपूर (9421800219)
कार्यालय सचिव महाराष्ट्र प्रदेश बसपा

Advertisement