– “नामांतर विरोध हाच जातीवादाचा कळस” : बसपा
नागपुर – मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव 26 जुलै 1979 ला मुंबई विधानसभेत एक मताने पास झाल्याने मराठवाड्यातील जातीयवादी मंडळींनी दलितांवर अन्य अत्याचार करून त्यांच्या घरांची राख रांगोळी केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी नागपुरात चार व पाच ऑगस्ट 78 ला निघालेल्या आंबेडकरी मोर्चावर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व नागपूर पोलीस आयुक्त एच सी अल्मेडा यांच्या दिशा निर्देशाने पोलिसांनी बेछुट गोळीबार केल्याने पाच भीमसैनिक मृत्युमुखी पडले व वीस भीमसैनिक गोळ्यांनी गंभीर जखमी झाले. नंतर 16 वर्षे नामांतराचे आंदोलन चालले त्यात अनेक लोक मारल्या गेलीत, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नागपुरात बांधण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने वीरचक्र वाहून अभिवादन केले.
नामांतर आंदोलनात नागपुरात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अविनाश डोंगरे, रतन मेंढे, शब्बीर हुसेन, किशोर काकडे, अब्दुल सत्तार बशीर, तसेच नामांतरासाठी बलिदान दिलेले पोचीराम कांबळे, जनार्दन मोवाडे, गोविंदराव भुरेवार, दिवाकर थोरात, रोशन बोरकर, दिलीप रामटेके, डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे, कैलास पंडित, गौतम वाघमारे, सुहासिनी बनसोड, प्रतिभा तायडे आदी शहिदांची नावे त्या शहीद स्मारकात कोरण्यात आलेली आहेत. याच परिसरात 20 लोकांना गोळ्या घालून गंभीर जखमी करण्यात आले होते.
नामांतर आंदोलनात व लॉंग मार्चमध्ये स्वतः बसपा नेते उत्तम शेवडे हे सहभागी असल्याने त्यांनी याप्रसंगी लॉन्ग मार्च व नामांतर मागील भूमिका व जातीयवादी शासनाची भूमिका विस्तृतपणे कार्यकर्त्यापुढे मांडली. याप्रसंगी बसपाचे प्रदेश सचिव नागोराव जयकर, रंजनाताई ढोरे, उत्तम शेवडे, विजयकुमार डहाट, पृथ्वी शेंडे, भीमराव वैद्य, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी, सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी तर समारोप माजी शहराध्यक्ष महेश सहारे यांनी केला.
या प्रसंगी माजी नगरसेवक संजय जयस्वाल, गौतम पाटील, सागर लोखंडे, कविता लांडगे, वीरंका भीवगडे, वैशाली चांदेकर, नरेंद्र वालदे, विकास नागभिडे तसेच अभिलेष वाहने, सदानंद जामगडे, योगेश लांजेवार, गौतम गेडाम, राजू चांदेकर, नितीन शिंगाडे, शादाब खान, अभय डोंगरे, चंद्रशेखर पाटील, अशोक गजभिये, बुद्धम राऊत, मॅक्स बोधी, विलास मून, तपेश पाटील, स्नेहल उके, शंकर थुल, संभाजी लोखंडे, जितेंद्र मेश्राम, मयूर पानतावणे, विलास सोमकुवर, चंद्रशेखर कांबळे, सुनील कोचे, अनिल मेश्राम, राजेश नंदेश्वर, अशोक गजभिये, बंडू माटे, दिलीप लांडगे, विकास नारायणे, बाळू मेश्राम, ओपुल तामगाडगे, विशाल बनसोड, चंदा सोमकुवर, वंदना कडबे आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.