Advertisement
बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीपजी ताजणे यांनी आज नागपूरला आकस्मिक भेट देऊन संगठन बांधणी चा आढावा घेतला, त्यामुळे बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे गुलदस्ता देऊन स्वागत केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव अविनाश वानखेडे, प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे, विजय डहाट, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, मनपा माजी पक्षनेते गौतम पाटील, प्रा परीक्षितकुमार, मुकेश तिरपुडे, समाधान कांबळे, संघनायक मोरे, भंडाऱ्याचे राजविलास गजभिये, सुरजभान चव्हाण, शंकर भेंडारकर, परशराम कुथे, प्रशांत रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.