कामठी :-केंद्र व राज्य सरकारने जीवणावश्यक वस्तूवर वाढीव दरवाढ केल्याने या वाढत्या महागाईने सर्वसामान्य चे आर्थिक बजेट बिघडले आहे . दिवसेंदिवस वाढीव महागाईवर असलेले पेट्रोल 112 रुपये प्रति लिटर झाले अशुभ डिझेलवर ही दरवाढ करण्यात आले आहे घरगुती सिलेंडर वर 50 रुपये वाढ करून 1002 रुपये झाले आहे ,खाद्यतेल ,किराणा, साबण ,सोडा यासारख्या अन्य जीवनावश्यक वस्तु वाढीव किमतीने आकाशाला भिडल्या असल्याने गरीब व सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
दिवसेंदिवस असलेल्या महागाईचा आलेख पाहिल्यास मागील काही वर्षात महागाई मोठ्या पटीने वाढली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.त्यातच पेट्रोल डिझेल,घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. त्यामुळे या महागाई विरोधात बसपा ने पुढाकार घेत पेट्रोल, डिझेल, गॅस ,साबण , सोडा यासारख्या इतर जीवनावश्यक वस्तूवरील दरवाढ कमी न केल्यास रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा बसपा च्या वतीने कामठी तहसीलदार मार्फत राष्ट्रपतिला दिलेल्या सामूहिक निवेदनातून देण्यात आला आहे.
हे सामूहिक निवेदन बहुजन समाज पार्टी चे कामठी मौदा विधानसभा अध्यक्ष नितीन सहारे यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदार आर बमनोटे यांना देण्यात आले.याप्रसंगी बसपा नागपुर जिल्हा सदस्य मनोज रंगारी ,कामठी वि स-बिवीएफ भीमराव राऊत, कामठी-मौदा विधानसभा सचिव गितेश सुखदेवे, कामठी-मौदा विधानसभा सचिव अतुल करिहार, कामठी शहर अध्यक्ष अमित भैसारे,राजन मेश्राम, संतोष मेश्राम, विकास रंगारी, विकास टेभेंकर, नागसेन गजभिये , रंजित गोस्वामी ,महिला विगं कार्यकर्ता रंजना विनोद मैश्राम,यामीनी गोस्वामी आदी उपस्थित होते