बुद्ध,भीम गीताच्या ऑर्केष्टाने श्रौते मंत्रमुग्ध
१७ ते १९ मे २०१९ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान: रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या विद्माने तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमाने तीन दिवसीय भव्य बुद्ध जयंती महोत्सवाची नटराज ऑर्केष्टाच्या बुद्ध, भिम गिताने थाटात सुरूवात करण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या विद्यमा ने आंबेडकर चौक कन्हान येथे शुक्रवार (दि.१७) मे ला सायं ७ वा. गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कन्हानचे थानेदार चंद्रकांत काळे, चंद्रशेखर भिमटे व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून ” नटराज ऑर्केस्टा ” नागपूरचे १२८ तास नॉन स्टाप वल्ड रिकार्ड बनविणारे सुरज शर्मा, (रामबाबु ) व्दारे बुद्ध, भिम गिताच्या प्रस्तुतीने तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सवाची थाटात सुरूवात आली. बुद्ध ,भीम गीताच्या ऑर्केष्टाने श्रौते मंत्रमुग्ध झाले. रात्री १२ वाजता केक कापुन, फटाक्यांच्या आतिषबाजीने बुद्ध जयंती च्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.शनिवार (दि.१८) ला सायं ६ वा. “कवी सम्मेलन” सुप्रसिद्ध आंबेडकरी साहित्यीक नागपुरचे संजय गोळघाटे, प्रसिध्द कवी सुदर्शन चक्रधर व संच व्दारे प्रस्तुती, रविवार (दि.१९) ला सायंकाळी ६ वाजता पंचशिल नगर सत्रापुर येथुन ” भव्य धम्म रैली ” काढुन कन्हान च्या मुख्य महामार्गा ने गांधी चौक, आंबेडकर चौक, तारसा रोड चौक मार्गक्रमण करित नाका नं.७ येथे भव्य धम्मरैली चे समापन करण्यात येणार आहे. या तीन दिवसीय भव्य बुध्द जयंती महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कैलास बोरकर, मोतीराम रहाटे, रमेश गोळघाटे, रोहित मानवटकर, चेतन मेश्राम, गोपाल गोंडाणे, सुनिल सरोदे, नरेश चिमणकर, महेंद्र वानखेडे , मनोज गोंडाणे, रविंद्र दुपारे, निखिल रामटेके सह रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे कार्यक्रर्ता गण सहकार्य करीत आहेत.