नवी दिल्ली: देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांच्या विकासासाठी निधी जाहीर करण्यास सीतारमण यांनी सुरुवात केली.याअंतर्गत कृषी क्षेत्राच्या विकासासाठी १.५२ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.
येत्या दोन वर्षात आम्ही नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढच्या दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासााठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
सरकारने कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे कृषी क्षेत्राच्या विकास झपाट्याने होणार आहे. शेतीची उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे. त्यामाध्यमातून त्यातून शेतीपिकांचे सर्वेक्षण आणि मातीची तपासणी केली जाईल. तसेच यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही सीतारमण म्हणाल्या.