Published On : Sat, Jun 3rd, 2017

परिवहन विभागाचा अर्थसंकल्प परिवहन समितीला सादर

Advertisement

नागपूर:  नागपूर महानगरपालिकेचा परिवहन विभागाचा आर्थिक वर्ष २०१७-१८ चा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांना सादर केला. सदर अर्थसंकल्प ११.२८ लक्ष शिलकीचा आहे. २५४५६.३३ लक्ष एकूण उत्पन्न आणि २५४४५.०५ लक्ष खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे.

शनिवारी (ता.३) परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत परिवहन विभागाने अर्थसंकल्प परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांना सादर केला. परिवहन समितीने या अर्थसंकल्पाला एकमताने मंजुरी दिली.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी बैठकीला परिवहन समिती सदस्या अभिरूची राजगीरे, अर्चना पाठक, कल्पना कुंभलकर, वैशाली रोहनकर, उज्ज्वला शर्मा, विद्या मडावी, समिती सदस्य नरेंद्र वालदे, निगम सचीव हरीश दुबे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे शहर बस परिवहन सेवा जी.सी.सी. तत्त्वावर सुरू करण्यात आली असून महानगरपालिका अधिनियमातील कलम ९७ व ९८ अन्वये परिवहन विभागाचे स्वतंत्र अर्थसंकल्प ‘ब’ तयार करण्याबाबतच्या तरतुदीनुसार सन २०१६-१७ मधील चार महिन्यांचा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०१७-१८ चा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यात आला असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी बैठकीत दिली.

या बैठकीत शहर बस वाहतुकीअतंर्गत वाहनचालकांवर होणारी कारवाई, यांत्रिकी स्थिती वाहन, अति वेग संबंधितचे तडजोड शुल्काबाबतच्या विषयावर चर्चा झाली. त्यावर ई-चालान सुधारित करून प्रस्तावास सादर करावा,असे निर्देश सभापती कुकडे यांनी विभागाला दिले. शहरबस वाहक व प्रवाशांमध्ये चिल्लरवरून बरेच वाद निर्माण होतात, त्यासाठी प्रत्येक वाहकामागे १०० रूपये Impressed Cash म्हणून देण्याकरिता यास मान्यता देण्याबाबतच्या विषयावर समितीद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली. परिवहन व्यवस्थापकांनी मनपा अधिनियम ९८ (१) अन्वये सादर केलेला अर्थसंकल्प ‘ब’ मध्ये फेरफार व बदल करण्याचे अधिकार परिवहन समिती सभापतींना एकमताने प्रदान करण्यात आले.
Attachments area

Advertisement