बुलढाणा : बुलढाणा येथे शनिवारी मध्यरात्री सिंदखेडराजा तालुक्यातील समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात २५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या मृतदेहावर बुलढाणा येथील संगम तलावाजवळील स्मशानभूमीत रविवारी दुपारी साडेबाराला अंत्यसंस्कार करण्यात आले. तर झोया शेख यांची ओळख पटल्याने त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोनला मुस्लिम कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून अंत्ययात्रा काढत मृतदेह घेऊन स्वर्गरथ स्मशानभूमीत दाखल झाले. त्यानंतर तेजस पोकळे (रा. वर्धा), करण बुधबावरे (रा. वर्धा), वृषाली वनकर (रा. पुणे), शोभा वनकर ( रा. पुणे) , ओवी वनकर ( रा. पुणे), ईशान गुप्ता ( रा. नागपूर), सुजल सोनवणे ( रा. यवतमाळ), तनिषा प्रशांत तायडे ( रा. वर्धा), तेजस्विनी राऊत ( रा. वर्धा) , कैलास गंगावणे ( रा. पुणे) , कांचन गंगावणे ( रा.पुणे), सई गंगावणे ( रा.पुणे), संजीवनी शंकरराव गोटे ( रा. वर्धा) , सुशील खेलकर ( रा. वर्धा), रिया सोमकुवर ( रा. नागपूर), कौस्तुभ काळे ( रा. नागपूर), राजश्री गांडोळे ( रा. वर्धा) , मनीषा बहाळे ( रा. वाशीम), संजय बहाळे ( रा. वाशिम), राधिका महेश खडसे ( रा. वर्धा), श्रेया विवेक वंजारी ( रा. वर्धा), प्रथमेश प्रशांत खोडे ( रा. वर्धा), अवंती परिमल पोहणेकर ( रा. वर्धा)व निखिल पाते ( रा. यवतमाळ) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी मंत्री गिरीश महाजन, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते. स्मशानभूमीत २४ पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर मृतकांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनातर्फे अस्थिकलश सुपूर्द करण्यात आले.