नागपूर : विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. यात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ ही दुर्घटना घडली. धक्कादायक म्हणजे बसमध्ये कालबाह्य झालेले प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र होते, जे फक्त 10 मार्च 2022 पर्यंत वैध होते असे तपासात समोर आले.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई १८१९ क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली.
बुलढाणा पोलिसांचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी सांगितले की, “एमएच-२९/बीई १८१९ क्रमांकाच्या नोंदणी क्रमांक असलेल्या बसमधून एकूण २५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. बसमध्ये ३३ प्रवासी होते, त्यापैकी ६-८ जण जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या अपघातात बस चालक बचावला, अशी माहिती बुलढाणा एसपी सुनील कडासणे यांनी दिली.
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.
24 जानेवारी 2020 रोजी यवतमाळ प्रादेशिक परिवहन कार्यालयात बसची नोंदणी करण्यात आल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. बसचा फिटनेस 10 मार्च 2024 पर्यंत वैध असताना, कालबाह्य झालेल्या PUC सह बस रस्त्यावर धावत होती. ही 10 मार्च 2023 पर्यंत वैध होती .
वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्राचे वेळोवेळी नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अवघा 50 ते 100 रुपये खर्च येतो. मात्र, पीयूसी नसणाऱ्या किंवा कालबाह्य झालेल्या पीयूसीचे नूतनीकरण न करता वाहने चालवणाऱ्यांना पकडल्यास मोठा दंड तर भरावाच लागतो. वेळोवेळी गाडीच्या पीयूसीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.