Published On : Thu, Sep 14th, 2017

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन म्हणजे निवडणुकांना प्रभावित करण्याचा कार्यक्रम

Advertisement

Nawab Malik

मुंबई: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे निवडणुकांना प्रभावित करण्याचा कार्यक्रम आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बोलत होते.

पुढे बोलाताना ते म्हणाले की, बुलेट ट्रेनचे अद्याप डिजाईन फायनल झालेले नाही, जमीन संपदित करण्यासाठी काही हालाचाली झालेल्या नाही, फक्त भूमिपूजन करून काय उपयोग होणार ? येणाऱ्या प्रत्येक दिवशी रेल्वेचे अपघात घडत आहेत. केंद्र सरकारने आधी भारतीय रेल्वेला पटरीवर आणावे मग देशात बुलेट ट्रेन आणण्याच्या वलग्ना कराव्यात असा खोचक टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला. याआधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनारसचा विकास करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी दाखवले होते. जपान सरकारसोबत भारत सरकारचे करारही झाले होते मात्र अद्यापही बनारसचा विकास झालेला नाही असे ते म्हणाले.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विद्यार्थी संघाच्या विचाराला नाकारत आहेत – मलिक

नुकतेच असाम, पंजाब, दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयूमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दारूण पराभव मिळाला. यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की विद्यापीठांच्या निवडणुकांमधून स्पष्ट संकेत मिळथ आहेत की विद्यार्थी संघाच्या विचारांना नाकारत आहेत. या विद्यापीठांमध्ये लागलेल्या निकालांचा येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये नक्कीच प्रभाव दिसेल आणि विद्यार्थ्यांप्रमाणेच देशातील जनता ही संघाच्या विचारांना नाकारेल असे मत त्यांनी व्यक्ते केले

Advertisement