नागपूर : नागपूरजवळील पाटणसावंगी येथे बुधवारी रात्री सशस्त्र टोळीने सराफा व्यापाऱ्याची ३० लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग लुटली. या घटनेनंतर व्यपाऱ्याने आरडाओरडा केला तेव्हा काही नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पीडित किशोर वामनराव मरजीवे यांचे पाटणसोंगी येथे दागिन्यांचे दुकान आहे. रात्री 9.45 च्या सुमारास दुकान बंद करत असताना त्यांनी 30 लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने अ माहिती मिळताच सावनेर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पीआय ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले. पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास केला. प्रथमदर्शनी, नागपूर (ग्रामीण) पोलिसांनी सांगितले की, हा पूर्वनियोजित दरोडा होता. सलेली बॅग गाडीत ठेवली. तीन सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांची बॅग चोरून पळ काढला. आरोपींनी यादरम्यान नागरिकांवर गोळीबार केल्याची माहिती आहे मात्र यात कोणालाही जीवितहानी झाली नाही.
दरोडेखोरांच्या शोधासाठी स्वतंत्र पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला.