नागपूर: अखिल भारतीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. राहुल गांधी यांच्या आदेशानव्ये युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा बरार यांनी नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांची युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त केले. खऱ्या अर्थाने राहुलजीनी जमीनी पासून जुडलेल्या कार्यकर्त्याची निवड करुन न्याय केला नागपूर शहरात नेहमीच आंदोलनाच्या भूमीकेतुन जनतेला न्याय देणारे तडफदार नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर उदयास आले. बंटी शेळके यांनी आपल्या नियुक्तीची श्रेय राहुल गांधी यांना दिले तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा बरार व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्वजीतजी कदम यांचे आभार मानले.
बंटी शेळके यांच्या नियुक्तीचे वृत्त आल्याबरोबर युवकात नवचैतन्य निर्माण झाले त्यांच्या नियुक्तीचे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला बंटी शेळके यांचे सामाजिक व राजकीय जीवन असेच प्रगतीपथावर राहिल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.अभिनंदन करणाऱ्या मध्ये शहर युवक कॉंग्रेसचे महासचिव आलोक कोंडापूरवार, पूर्व नागपूर युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय घाटोळे, कांग्रेस नेते राजेंद्र ठाकरे, सोशल मिडिया प्रभारी स्वप्निल बावनकर, सोशल मिडिया अध्यक्ष हेमंत कातुरे, सौरभ शेळके, स्वप्निल ढोके, सागर चव्हाण, राम शास्त्रकार,आशीष लोनारकर, नितिन गुरव, राहुल मोहोड़, निखिल नंदनवार, पियुष खड़गी, पूजक मदने, हर्षल हजारे, अंकुश कळबे, तेजस मून, नितिन सुरुशे, अतुल मेश्राम, अथर्व तिजारे यांनी अभिनंदन केले.