नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे बर्डी-प्रभूनगर-न्यू सोमलवाडा ही फेरी नव्याने तर बर्डी-समतानगर ह्या फेरीचा विस्तार करण्यात आला आहे.
बर्डी-प्रभूनगर-न्यू सोमलवाडा मार्गे नरेंद्र नगर या बस फेरीचे उद्घाटन नगरसेविका विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संदीप गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन पडोळे, रविकांत चोरघडे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता नगर-बर्डी-जेरीन लॉन या बस सेवेचे उद्घाटन नगरसेविका वनिता दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर दाते व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बस फेऱ्यांसाठी मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी पाठपुरावा केला. सदर बस सेवेची मागणी येताच परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी तत्परतेने दखल घेऊन परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी त्यावर कार्यवाही केली. या दोन्ही मार्गावरील बसने नागरिकांनी प्रवास करावा व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन समितीतर्फे करण्यात आले आहे.