Advertisement
नागपूर : कामठीजवळील रनाळा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी दुपारी ‘आपली बस’ला आग लागली. बसला आग लागल्याचे काळातच चालकाच्या सतर्कतेने सहा प्रवासी सुखरूप बचावले आहे.
बस क्रमांक (MH31/FC-0971) शांतीनगर मार्गे सीताबर्डी ते कामठीला जात होती. गुरुवारी दुपारी ३.१० च्या सुमारास चालक मनिष भोसले यांना इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. चालकाने कंडक्टर पौर्णिमा कुऱ्हाडकर यांच्या मदतीने पोर्टेबल अग्निशामक यंत्राचा वापर करून आग विझवली.
यादरम्यान आग वीजवण्यासाठी रस्त्यालगतच्या दुकानदारांनीही मदत केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.