बुलढाणा: नागपूरहून नाशिकला जाणाऱ्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाला.या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर मलकापूरजवळ ही घटना घडली.घा
अपघातग्रस्त बसेसपैकी एक बस अमरनाथहून हिंगोलीला जात होती. दुसरी बस नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात होती. नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या बसच्या चालकाने ओव्हर टेकिंग करण्याच्या प्रयत्न केला आणि दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. कंपनीच्या दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बसेसपैकी एक बस अमरनाथहून हिंगोलीला जात होती. दुसरी बस नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात होती. नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या बसच्या चालकाने ओव्हर टेकिंग करण्याच्या प्रयत्न केला आणि दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली आणि मोठ्या अपघात घडला.