नागपूर : विदर्भातील भंडारा-गोदिया व गडचिरोली या भाजपाच्या तर यवतमाळ वाशिम ही जागा शिंदे यांच्याकडे आहे. अमरावती व बुलडाणाबाबत लवकर निर्णय होईल, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,२५ तारखेपर्यंत महायुतीच्या सर्व जागांबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महायुतीचे घटक पक्षाचे नेते व भाजपाचे वरीष्ठ नेते आपसांत चर्चा करून ठरवितील.
ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, रामटेकची जागा भाजपाला द्यावी अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. रामटेकसाठी शिंदे यांनी मोठे मन करावे. अखेर चर्चा होऊन कुणालातरी मागे पाऊल घ्यावे लागेल.
ते म्हणाले, “जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाही व जगातील सर्वांत मोठी निवडणूक, महाराष्ट्रात सर्व पक्ष चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील, आरोप- प्रत्यारोप न करता खिलाडूवृत्तीने ही निवडणूक लढावी. निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशभर उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए 400 प्ल्स जागांवर विजय मिळवेल. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार शपथविधीला उपस्थित राहतील. प्रत्येक बुथवर ५१% मते मिळतील यासाठी भाजपा काम करेल. विजयासाठी भाजपा महायुतीमधील घटक पक्षांना मदत करणार आहे, आम्ही गाफील नाही असेही त्यांनी सांगितले.