Published On : Wed, Nov 29th, 2017

कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा महावितरणला अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

Advertisement
Krishi Pump

File Pic

मुंबई: राज्यातील कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्यात आल्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली. यासाठी महावितरणला अतिरिक्त खर्चाची भरपाई देण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 सष्टेंबर ते 15 डिसेंबर 2016 या कालावधीत 8 ते 10 तासां ऐवजी बारा तास दिवसा वीज पुरवठा करण्यात आला. यामुळे महावितरण कंपनीवर 1930 दशलक्ष युनिट वाढीव वीज शेतकऱ्यांना पुरवावी लागली. त्यामुळे महावितरणवर अतिरिक्त खर्चाची कोटी व भंडारा, गोंदिया व ब्रम्हपुरी या भागातील शेतकऱ्यांना 3 मार्च, 2017 ते 15 मे 2017 या कालावधीत 100 मे. वॅ. एवढया वीज पुरवठयासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भरपाई करणे आवश्यक होते. या खर्चाच्या भरपाईचा ठराव ऊर्जा विभागातर्फे मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आळा. मंत्रिमंडळाने त्यास मान्यता दिली.

शेतीसाठी सदरचे पाणी, 8/10 तासांच्या वीज उपलब्धतेमुळे पुरेशा प्रमाणात वापरता येत नव्हते. त्यामुळे सदर विभागामध्ये, कृषी पंपासाठी सध्याच्या 8/10 तासांच्या प्रचलित धोरणात तातडीने बदल करुन सलग 12 तास वीज उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राज्यातील विविध भागातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार मागील वर्षी माहे सप्टेंबर ते डिसेंबर, 2016 या कालावधीत राज्यातील पीक परिस्थितीनुसार कृषीपंपाना 4 तास थ्री फेज अतिरिक्त वीजपुरवठा करण्यात आला.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement