Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. हा निकाल आल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्या आहे. याबाबतचे संकेत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिले. आज ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मंत्रिमंडळात माझी वर्णी कधी लागणार, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.
माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन २१ ते २२ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असेही ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित आहे. जर आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.