नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदान संघात नुकतेच मतदान पार पडले. आता कोल्हापूरमध्ये निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपुरातून सर्व कार्यकर्ते कोल्हापूरला जाणार आहेत.त्यासाठी भाजपने विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था केली.
भाजप तर्फे कार्यकर्त्यांसाठी आज रात्री पावणे बाराला २० डब्यांची इलेक्शन स्पेशल ट्रेन नागपूरहून कोल्हापूरकरिता रवाना होणार आहे.
ही स्पेशल ट्रेन गोरखपूर येथून नागपुरात बोलाविण्यात आली असून भाजप कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाठवण्याची या स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष रेल्वे गाडीसाठी १० लाख खर्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी साडेचार लाख रुपये देऊन ही गाडी बूक करण्यात आली आहे, अशी माहिती आहे. पुढील टप्प्यात २५ एप्रिलला पुन्हा एका विशेष गाडीची व्यवस्था नागपूर येथून भाजप कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे.