नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे.मंगळवारी नाना पटोले हे प्रचारसभा संपवून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली.या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा तपास सुरू केला.
माहितीनुसार, ट्रक चालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्याने हा अपघात झाला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौऱ्यावर गेले होते.
गाडीचा अक्षरशः चुराडा-
हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.सर्व जण सुरक्षीत असल्याची माहिती आहे.