नागपूर – नागपुरात कारमध्ये सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी वर्दळ नसलेल्या ठिकाणांवर संशयास्पद परिस्थितीत उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या तपासणीचे अभियान सुरू केले आहे.
मागील तीन ते चार महिन्यांत नागपूरमध्ये व्यापक प्रमाणात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. नागपुरातील उच्चभ्रू वस्त्यांमधील इमारती, हॉटेल, लॉजेससह काही ब्यूटी पार्लर्समध्येही सेक्स रॅकेट सक्रिय असल्याचे आढळून आले होते. मात्र, पोलिसांच्या वाढत्या कारवाईमुळे आता कारमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गोपनीय पद्धतीने पोलिसांच्या निर्दशनात आला आहे.अंधारात उभ्या करण्यात आलेल्या कारमध्ये मागील सीट काढून चक्क बेड तयार करण्यात येत आहे. कारच्या काचांना काळी फिल्म लावण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरात अशा प्रकारचे सेक्स रॅकेट सुरू असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच गेल्या वर्षभरात नागपुरात अनेक हत्या, छेडछाड यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
नागपुर शहरात दलाल सक्रीय –
सेक्स रॅकेटच्या व्यवसायात दलाल आता हाइटेक झाले असून पोलिसांना मुर्ख बनवित आहेत ? डांसिंग कार आता भर रात्र दिवस रस्त्यावर धावत आहे. सोशल मिडिया वर काही व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. याबाबत नागपूर पोलिसांना माहिती असून लवकरच मोठी कारवाई कधी होईल यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे
– रविकांत कांबळे