Published On : Fri, Mar 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

काळजी घेणारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

विदर्भातील माजी मंत्री माजी खासदार श्री अनंतराव देशमुख व त्यांचे सुपुत्र श्री नकुलजी अनंतरावजी देशमुख सहित काल तब्बल 300 स्थानिक स्वराज्य पदाधिकार्‍यांनी व काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काल मुंबई येथे गेल्यानंतर असं वाटलं इतर पक्ष प्रमाणे ही इथली कार्यकर्त्यांची वागण्याची पद्धत त्यांची काळजी घेण्याची पद्धत असेल परंतु काल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जी यांची पल्या पक्षात येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्यांशी बोलण्याची वागण्याची त्यांची काळजी घेण्याची पद्धत ही मन जिंकणारीच होती.

माननीय भाऊसाहेब अनंतरावजी देशमुख व त्यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सामान्यांच्या काळजी त्यांचा प्रत्येकी पक्षप्रवेश त्यांच्याशी हितगुज आणि कार्यकर्त्यांशी आपुलकीने संवाद साधण्याची त्याची पद्धत ही राजकारणात काम करताना मागील पंधरा वर्षात कधीच बघितली नव्हती अतिशय साधेपणा उपस्थित सर्वांशी संवाद साधला गेला पाहिजे अशी कार्यप्रणाली सोबत जो कोणी त्यांच्याकडे स्मित हास्याने बघेल त्याला स्मितहास्य करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची त्यांची कसब सामान्य माणसाला आरे बोल बिंदास बोल जबरदस्त हिम्मत देण्याची पद्धत ही मन जिंकणारी होती.

काल तब्बल साडेतीन तास त्यांना स्टेजवर बघत होतो आणि इतर ठिकाणी वावरताना त्यांना बघत होतो एवढ्या मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असलेला हा माणूस कमालीचा सामान्य आहे कारण सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात येणाऱ्या लोकांना ते अतिशय साधेपणाने बोलत होते सांभाळत होते. मनाला भिडून गेली ती एक गोष्ट ज्या मागील १५ वर्ष पक्षात काम केले त्या पक्षाच्या कार्यालयात गेल्याच्या नंतर बाकीचे तर सोडा परंतु एखाद्या पदाधिकाऱ्यालाही मानसन्मान नसायचा परंतु सोशल मीडियावरती आणि इतर माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांची ची बदनामी केली जाते ती काल डोळ्यासमोर साप चुकीची आहे आणि अशा चांगल्या लोकांना बदनाम करून स्वतःच्या राजकारण वाढवण्याचा इतर पक्षाचा प्रयत्न आमच्या समोर फेल पडताना दिसत होता आणि त्या लोकांबद्दल आमच्या मनामध्ये अधिकच आदर वाढतच होता.

काल आम्ही पक्षप्रवेश करायला गेलो आम्ही नवीनच होतो आमच्या साहेबांच्या नेतृत्वात आम्हाला भाजपमध्ये प्रवेश करायचा होता असं वाटलं स्वतःचीच जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागेल एवढा वेळ तिथे गेल्यानंतर कुठेतरी बाजूला असलेल्या खाऊ गल्ली नावाच्या त्या एरिया मध्ये जाऊन स्वतः काहीतरी नाष्टा करून पोट भरावा लागेल परंतु या मन जिंकणाऱ्या आणि कार्यकर्त्यांची कदर करणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनी सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी यांच्या जेवनाची व्यवस्था केली होती या आयुष्यात कोणत्यातरी पक्ष कार्यालयात पहिल्यांदाच बघत होतो आणि क्षणाक्षणाला उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या बद्दल मनात अधिकच आदर वाढत होता आणि मनात शेवटी एक विचार बनला तो विचार असा असे प्रदेश अध्यक्ष आणि असे लोकप्रिय राज्याचे नेतृत्व अशा प्रकारे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची व येणाऱ्या प्रत्येकाची काळजी करत असतील दूरवरून येणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याला जेवणाची व्यवस्था करत असतील त्यांच्याशी आपुलकीने हितगुज करत असतील संवाद साधत असतील आणि त्यांच्या पाठीवरती थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देत असतील तर हा पक्ष उगाच मोठा झाला नाही तर अशा लोकांमुळे हा पक्ष मोठा झाला आहे

काल एक गोष्ट कायमची लक्षात बसली की हे लोक मनाने मोठे आहेत म्हणून हे इतरांना मानसन्मान देतात त्यांची काळजी घेतात आणि अशाच लोकांमुळे भारतीय जनता पक्ष मोठा झाला आहे आणि श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष श्री बावनकुळे साहेब यांच्यासारख्या संवेदनशील आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांमुळे या पक्षाची पाळामुळे इतकी खोल रोवली जाणार आणि आम्हीही त्यांनी दिलेल्या प्रोत्सानामुळे हे पाळामुळे खोल रुजवणार आणि त्यांचे हात बळकट करणार कारण बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या सारखी चांगली माणसं हे राज्याच्या सत्तेत असणार आणि शीर्ष ठिकाणी असणं अत्यंत गरजेचे आहे अन्यथा कार्यकर्त्यांना मानसन्मान न देणारी त्याची काळजी न घेणारी लोक परत सतेत्त झाल्यास ना राज्याचं भलं होणार ना सामान्य माणसाच मुळे मन जिंकणाऱ्या या दोन माणसाच्या मागे माने भाऊसाहेबांचे नेतृत्वात अतिशय जोशाने काम करायचे आणि या लोकांचे हात बळकट करून चांगली माणसं कशी असतात हे राज्याला दाखवून देण्यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे