नागपूर : शहरातील कामठी परिसरात सुरु असलेल्या गोवंश तस्करीचा पोलिसांकडून भंडाफोड करण्यात आला.पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली.रामटेक येथील आकिब अहमद उर्फ छती अयाज अहमद असे आरोपीचे नाव आहे.अहमद हा मालवाहू वाहनातून बेकायदेशीरपणे गुरे कत्तलखान्यात नेत असताना आढळून आला.
गुप्त माहितीनुसार,पोलिसांनी संजय नगर बंगाली कॉलनी परिसराला वेढा घातला. यानंतर मालवाहू वाहनाला थांबविण्यात आले.तपासणी केल्यावर त्यांना ८ गायी क्रूरपणे बांधून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहन जप्त केले आणि सर्व गुरे सोडवून नवीन कामठी गोशाळेत पाठवली.
याप्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सून चालकाला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ८० हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. कामठी पोलिसांच्या या जलद कारवाईचे स्थानिक लोकांनी कौतुक केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.