नागपूर: तामिळनाडूतील 65 शेतकऱ्यांनी नागपूर स्थानकावर आंदोलन करत 40 मिनिटे ट्रेन रोखून धरली. कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्यामुळे नागपुरातही कावेरी नदीचा मुद्दा गाजला.
सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास 16032 कटरा-चेन्नई अंदमान एक्सप्रेस नागपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचली.
यावेळी ट्रेनमध्ये आधीच बसलेले ६५ शेतकरी जेवणाच्या बहाण्याने ट्रेनमधून खाली उतरले आणि इंजिनमध्ये चढत आंदोलन सुरु केले.शेतकऱ्यांनी सुमारे 40 मिनिटे रेल्वे रोखून धरली. त्यामुळे स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांनी संधी मिळताच नागपूर स्थानकावर रेल रोको निदर्शने केली. त्यानंतर आरपीएफने प्रकरण शांत केले आणि सर्व शेतकऱ्यांना ट्रेनमध्ये बसवले.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे काही गाड्या अन्य फलाटांवर वळवण्यात आल्या.
हे सर्व शेतकरी २७ जुलै रोजी जीटी एक्स्प्रेसने दिल्लीला निघाले होते. दरम्यान, पोलिसांनी सर्व शेतकऱ्यांना नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर उतरवले. तसेच अंदमान एक्स्प्रेसमध्ये अतिरिक्त जनरल डबा जोडून सकाळी 11.15 वाजता चेन्नईला रवाना केले.