नागपूर : नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या ‘नीरी’ मुख्यालयात आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) छापेमारी सुरु केली आहे. महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.
सीबीआयच्या विशेष पथकाने आज सकाळी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ‘नीरी’वर छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. या छाप्यात निरीमधील महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत घोर अनियमितता झाल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे.
विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयला मिळालेल्या एका ठोस तक्रारीच्या अनुषंगाने हा छापा टाकण्यात आला. ‘निरी’कडून कोणते रिसर्च आणि महागडे उपकरण खरेदी करण्यात आले यासंदर्भात सीबीआयकडून तपास सुरु आहे. संशयास्पद शास्त्रज्ञ कार्यालयाची झडतीसह कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान कोणालाही निरीच्या मुख्यालयात जाऊ दिले जात नाही. सीबीआयसह स्थानिक पोलिसही उपस्थित आहेत.