नागपूर : सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भात माहिती दिली. यंदा एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशात गेल्या वर्षी (2023) एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 होती. म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के इतका लागल्याने मुलीच वरचढ ठरल्या आहेत. यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसईने यावर्षी देखील मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली नाही.
‘या’ वेबसाइटवर चेक करा निकाल-
सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थाना निकाल पाहता येईल. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसेच काही वेळातच विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजिलॉकरमध्ये देखील उपलब्ध होईल असं सीबीएसईने स्पष्ट केले आहे.