Published On : Fri, May 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सीबीएसई १२ वी निकाल जाहीर, यंदाही मुलींचाच डंका !

Advertisement

– सीबीएसई (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींचाच डंका कायम आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी जास्त आहे. बारावी परीक्षेत 90.68 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67 टक्के आहे.एकूण या परीक्षेत 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डात 91.25% मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त 84.67% मुले उत्तीर्ण झाल्याने निकालाची टक्केवारी थोडी घसरल्याचे चित्र आहे. एकंदरीत वर्षी 94 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या, तर यावर्षी केवळ 90.68 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.दरम्यान सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) cbse.gov.in आणि cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी बारावीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर टाकणे आवश्यक आहे.

Advertisement