बेला: जवळच्या शिद्धेश्वर येथील विद्याधन हायस्कूलमध्ये गणराज्य दिनाच्या शुभपर्वावर यंदाही स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संचालक विलास भू डे, मुख्याध्यापक एस सी राऊत, पीच काटे, श्याम कुवर राजेंद्र कुमरे व देशमुख मॅडम मंचावर उपस्थित होत्या.
व्हिडिओ स्नेहसंमेलनाचे निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा व संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात दहावीची विद्यार्थिनी सुहानी जानवी बाळबुधे अचल राऊत तेजस राऊत मयुरी कन्नाके सानिया राऊत नववीच्या सानिका राऊत रश्मी शिरोशी दिव्य असोले काजल भगत अनुष्का शेंडे पायल शिंदे इत्यादी विद्यार्थ्यांची ची भूमिका उल्लेखनीय व लक्षवेधक ठरली.
सांस्कृतिक कार्यक्रमात हुंडाविरोधी नाटक, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री साक्षरता, सामाजिक एकोपा व सर्वधर्मीय सलोखा आदी विषय अनुषंगाने नाट्य व नृत्य सादर करण्यात आले. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला.` व नामकरण सोहळा कार्यक्रम खूप गाजला आईचा जोगवा एकच राजा इथे जन्मला या नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व री रिजवी ले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शालेय मुला-मुलींमध्ये ते व त्यांचे कलागुण पाहणाऱ्या पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्याधन हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद शिक्षिका विद्यार्थी प्रतिनिधी व व उत्साही मुला-मुलींनी मुलाचे परिश्रम घेतले. स्वरूची भोजनाने थाटात सांगता झाली.