नागपूर : महाराष्ट्रात स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे राजकीय कार्यकर्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांची ११९वी जयंती आज शनिवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यास येथे साजरी करण्यात आली.
नामप्राविप्र’चे अप्पर आयुक्त श्री. हेमंत पवार यांच्याहस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अधीक्षक अभियंता (मुख्यालय) श्री सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अभियंता (मुख्यालय) श्री. पी.पी. धनकर आणि कार्यकारी अभियंता श्री. पी पाघृत तसेच इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते