जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दीनदयालनगर येथील आजी-आजोबा उद्यानात ज्येष्ठ महिलांनी सर्वप्रकारची योगासने करुन योग दिवस साजरा केला. स्वस्थ आरोग्याकरिता योगाचे महत्व ज्योती शेंबेकर यांनी महिलांना सांगितले.
कोरोनाच्या सावटाखाली सर्व नियमांचे पालन करुन महिलांनी योग दिवस उत्साहात साजरा केला. या उद्यानात सर्व महिला सकाळी ६ ते ८ यावेळात दररोज पायी चालणे, ग्रीन जीम, शरीर संचलन, योगासने तर करतातच शिवाय प्रार्थना देशभक्ती गीते ही म्हणतात तसेच सर्वांना आनंद देणारी खेळही खेळतात त्यामूळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.
शरीर स्वस्थ ठेवणे आनंद देणे व घेणे यामुळे सर्वांचे आरोग्य ही उत्तम आहे. उद्यानात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वाढदिवस साजरे करणे, गरजुंना मदत करणे हेही उपक्रम राबविले जातात.