Advertisement
नागपूर: भारतीय संविधानाला स्विकृती मिळाल्याचा दिवस म्हणून महावितरण नागपूर परिमंडलाच्या विद्युत भवन कार्यालयात संविधानाच्या प्रस्ताविकेचे जाहीर वाचन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेला अभिवादन करीत संविधान दिन साजरा करण्यात आला.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या प्रस्ताविकेचे जाहीर वाचन करण्यात आले. यावेळी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, कार्यकारी अभियंता समीर शेंद्रे, उपव्यवस्थापक (मानव संसाधन) अमित पेढेकर यांचेसह परिमंडल कार्यालयातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,