कन्हान : – पोलीस स्टेशन गांधी चौक येथे कन्हान शहर विकास मंच व्दारे सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथि कार्यक्रमासह साजरी करण्यात आली. कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष ऋुषभ बावनकर,उपाध्यक्ष माधव वैद्य यांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी मंच सचिव दिनेश भालेकर यांनी सरदार पटेल यांच्या जिवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंच कोषाध्यक्ष मुकेश गंगराज यांनी तर आभार प्रदर्शन मंच प्रसिद्धि प्रमुख शाहरूख खान यांनी व्यकत केले.
कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंचचे प्रकाश कुर्वे, दिनेश भालेकर, बाळा मेश्राम, हरीओम नारायण, नितिन मेश्राम, अक्षय फुले आदी प्रमुख्याने उपस्थित होते .