कन्हान : – ग्रामिण विकास विद्यालय सालवा येथील इयत्ता ७ वी अ च्या विद्यार्थ्यानी विविध उपक्रमाने जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला. जीवन जगण्यासाठी आहाराचे महत्व, सर्वोच्च अशा मानवी समुदाया कडून अन्नाचे असतुलीत वितरण याबाबत जागृती व्हावी त्यासाठी जागतिक अन्न दिन साजरा करण्यात येतो.
विद्यार्थ्यांनी विविध तक्ते , मॉडेल्स यांच्या माध्यमातून अन्न पदार्थांशी संबंधित विविध बाबी जसे अन्नाचे महत्व, विविध अन्नघटक, अन्नाची नासाडी ,अन्नाची भेसळ , अन्न संरक्षण करण्यासाठी काय करता येईल यावर सादरीकारण केले. ओम गणेश दारोडे व दिपेश सुधीर पडोळे या विद्यार्थ्यांनी अन्न सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल , आजच्या काळात पाण्या एवढेच अन्न वाचविणे आवश्यक आहे . यावर आपले मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षक लक्ष्मिकांत बांते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना निदान आपल्या वैयक्तिक स्तरावर आजपासून अन्न वाया जाणार नाही या संबंधित प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमास विद्यालयाचे संस्थासचीव विजयराव कठाळकर व मुख्याध्यापक राजेश मोटघरे यांनी शुभेच्छा दिल्या .