कन्हान : – के डी के कॉन्व्हेंट टेकाडी येथे विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे दुकान लावुन मनसोक्त स्वाद घेत आंनद मेळावा साजरा करण्यात आला.
आंनद मेेळाव्याचे शाळेचे संचालक अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षेत व जेष्ठ नागरिक भाऊरावजी कांबळे, पत्रकार किशोर वासाडे, ग्रा प सदस्य दिनेश चिमोटे, संजय राऊत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ उमेश राहंगडाले, सतिश कुरडकर, कार्तिक मोहाडे, कमलाकर राऊत, नितीन वानखेडे, सुर्यभान टाकळखेडे, रतन कांबळे, यशवंत कडु, चंद्रशेखर कुरडकर, भोजराज उमप, सुधाकर सावरकर, अनुपम राऊत, रामायण प्रसाद, बेनीमाधव सिंग, रूपाली मोहाडे , अर्चना कुरडकर, कविता कांबळे, शोभा बेलदार, रेखा सिंग, प्रणाली कुरडकर, वासाडे ताई, बबिता प्रसाद, सावरकर ताई, उमप ताई, शुदा बेलदार विद्यार्थ्यां च्या विविध खाद्य पदार्थाचे दुकानाचे निरिक्षण करित स्वाद घेत उत्कुष्ट विद्यार्थ्यांची निवड केली. तद्नंतर विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे मनसोक्त स्वाद घेत व्यावहारिक शिक्षण आत्मसात करित आंनद मेळावा साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन दिपाली वझेकर यांनी तर आभार सुरेखा कांबळे यांनी केले. यशस्वीते करिता मुख्याध्यापिका मनिषा कांबळे , निशा देशमुख, सुरेखा हिंगे, रिना किशोर, अर्पणा गजभिये, रिता चव्हाण, हर्षदा हुड, अंबादास सातपैसे आदीने सहकार्य केले.