नागपूर: संपूर्ण जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. २०१५ पासून मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येतो.योग ही “भारताची देणगी” असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांचा प्रस्ताव अखेर मान्य झाला.
अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम,धंतोली, नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि महाराष्ट्र भाजपा चे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुले (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला गेला.
या अवसरावर योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना श्री गडकरी जीने म्हणाले, “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी (Narendra Modi)
ज्यांच्या नेतृत्वाखाली हमी ‘वसुधैव कुटुंबकम के लिए योग’ ची भावना घेतल्यानुसार आज योग दिवस साजरा करत आहोत।”
Live from Celebration of International Yoga Day-2023 at Nagpur. #YogaforVasudhaivaKutumbakam #InternationalDayofYoga2023 https://t.co/nnR4J5Qzgp
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 21, 2023
योग ही “भारताची देणगी” ….; आज जागतिक योग दिवस !
२१ जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी हीच तारीख निश्चित करण्यात आली. निवडण्यात आली. जगभरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत म्हणून त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत योगाला महत्व देण्याच्या उद्देशाने या दिनाची सुरुवात करण्यात आली.
जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा.
भारतीय प्राचीन संस्कृती योगसाधनाला महत्त्व- भारताच्या प्राचीन संस्कृतीत योग साधनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे.