Advertisement
नागपूर, : रामायणाचे रचेते तसेच संस्कृत, ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे सखोल अभ्यासक महर्षी वाल्मिकी यांची जयंती आज बुधवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.
नासुप्रमध्ये उप जिल्ह्याधिकारी श्री. अविनाश कातडे यांच्याहस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी नासुप्र’चे महाव्यवस्थापक श्री. श्रीकांत सुखे, कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, नगर रचना विभागाचे सह संचालक श्री. आर. डी. लांडे, सहायक अभियंता श्री. ललित राऊत, आस्थापना अधिकारी श्री. योगीराज अवधूत आणि जनसंपर्क व सचिव-१ श्रीमती कल्पना गीते तसेच नासुप्र’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.