कामठी :-वारकरी संप्रदायाची पताका सम्पुर्ण भारतभर पसरविण्यारया संत श्री सेनाजी महाराज पुण्यतिथी सोहळा गुड ओली येथे नाभिक एकता मंच च्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमांची सुरूवात संत सेनाजी महाराज च्या प्रतिमेला माल्यार्पन,दिप प्रज्वलन करुन करण्यात आले,सोहळ्यात संत सेनाजी महाराज वर वारकरी भजन व विविध कार्यक्रमाचेआयोजन करुन समाजातील जेष्ठ नागरीकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता प्रसादाचे वितरण करून करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रामुख्याने रवी पारधी, मनोज धानोरकर, गजानन बोरकर, सुनील धांडेकर ,विशाल चन्ने, देवेंद्र फुलबांधे ,सुरेश बोपुलकर, श्रीधर चन्ने, अमोल उके,संजय सुर्यवंशी,गंगाधर साखरकर, अंकित आस्कर, सचिन अमृतकर, सुदाम चौधरी, आशिष श्रीवास,अजय श्रीवास, सतीश नक्षीने,सुरज लक्षणे, अशोक ढोके, मुकुल चन्ने, दिलीप खुरगे, संतोष खुरगे. व मोठ्या संख्येनी नाभिक बांधव उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी .