Published On : Sat, Apr 21st, 2018

व्हॉईट टॉपिंग पद्धतीने बांधण्यात येणा-या सीमेंट रस्त्यांची मनपाच्या अभियंत्यांनी जाणून घेतली माहिती

Cement Road Construction (4)
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्व अभियंत्यांनी सीमेंट रस्ते बांधण्याकरिता वापरण्यात येणा-या व्हॉईट टॉपिंग पद्धतीची माहिती विशेष आमंत्रित सीआरआयआयचे वरीष्ठ वैज्ञानिक बिनोद कुमार यांच्याकडून जाणून घेतली. महानगरपालिकेद्वारे शनिवार (ता.२१) महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवनात यासंबधी मनपाच्या प्रकल्प विभागाद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून सीआरआरआयचे वरिष्ठ वैज्ञानिक बिनोद कुमार, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, मनपाचे तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, अल्ट्राटेक सीमेंटचे हिरेमठ प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मुख्य अतिथी विनोद कुमार म्हणाले, कमीत कमी खर्चात आवश्यकतेनुसार व्हॉईट टॉपिंग पद्धतीचा वापर करून सीमेंट रस्ते बांधण्याबाबत तसेच ही पद्धत अबलंबल्यास होणारे फायदे व पर्यावरणाचा समतोल राखण्यास उपयुक्त ठरेल. याशिवाय सीमेंट रस्त्यांच्या कामामुळे डांबरी रस्त्यांच्या तुलनेत तापमान कमी राखण्यास मदत होते. भविष्यात येणाऱ्या बांधकामाकरिता लागणा-या गिट्टी, रेती यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल. व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. अडचणीवर मात कशी करता येईल, याचीही माहिती त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिली. क्राँक्रिटचे अर्थशास्त्र आणि त्याचे मूल्य याबाबतही बिनोद कुमार यांनी उपस्थितांना पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. सस्टेनेबल डेव्हलपमेंट याविषयाची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यावेळी बोलताना म्हणाले, सद्यस्थितीत नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बांधकाम सुरू आहे. नव्या अभियंत्याना वा कंत्राटदारांना त्याचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. यासाठीच अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असते. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल त्यांनी महानगरपालिकेचे आभार मानले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत मुख्य अभियंता मनोज तालेवार आणि कार्यकारी अभियंता डी.डी.जांभूळकर यांनी केले. सर विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी केले. तांत्रिक सल्लागार विजय बनगिरवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, डी.डी. जांभूळकर, आर.एस.भूतकर, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रकल्प विभागाचे उपअभियंता शकील नियाजी, धनंजय मेंडूलकर, अनिल गेडाम, संजय माटे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित होते.

Advertisement