नागपूर: शहरातील जनतेने आता सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाला विरोध सुरू केला आहे. सिमेंट रस्ते टिकाऊपणा देतात परंतु पाणी साचणे, भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होणे आणि वाढलेली आर्द्रता यासारखे धोके निर्माण करतात. नागपूरला 2023 मध्ये पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागला आणि अलीकडेच पुन्हा मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले. सिमेंट रस्त्यांचे विस्तीर्ण बांधकाम याला कारणीभूत ठरल्याचे ही परिस्थिती निर्माण झाल्याच्या तक्रारी जनतेने ‘नागपूर टुडे’शी बोलताना व्यक्त केल्या. कुणी सिमेंट रस्त्यांना विरोध केला तर कुणी हे रस्ते चांगले असल्याचे म्हंटले आहे.
सिमेंट रस्ते उंच असल्याने घरात शिरते पाणी –
नागपुरात आता लोकांनी सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाला विरोध सुरू केला आहे. २३ सप्टेंबर २०२३ रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठी नदी नसतानाही अख्खे नागपूर पाण्याखाली बुडाले. परिस्थिती इतकी बिकट झाली की एसडीआरएफ, एनडीआरएफ, लष्कराला नागरी वस्त्यांमध्ये बोटींच्या साह्याने बचाव कार्य करावे लागले. घरापेक्षा उंच सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले.
सिमेंट रस्त्यांच्या शेजारी सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजच नसल्याने परिस्थिती अधिक बिकट होत गेली. अनेक मजली अपार्टमेंटमधील तळ मजल्यातील घर तर छातीपर्यंत पाण्यात बुडाली होती. नागपुरात आलेल्या या महापुरामुळे आता लोक सिमेंट रस्त्यांना घाबरत आहेत. त्यामुळे लोकांनी सिमेंट रस्त्यांना विरोध सुरू केला आहे.
View this post on Instagram