दिव्यांगासाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : केद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या नागपूरच्या धंतोली स्थित समेकित क्षेत्रीय कौशल विकास ,पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र -सी आर सी च्या वतीने ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १४ ऑक्टोबर २०२१ रोज कविवर्य सुरेश भट सभागृह येथे दिव्यांग बालक आणि बांधवासाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
दिव्यांग बांधवांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळावे हा या अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी दिव्यांग बांधवांची गायन स्पर्धा , एकल आणि समूह नृत्य स्पर्धा , आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नागपूर महानगर पालिकेचे महापौर दयानंद तिवारी, दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार मोहन मते हे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला उपस्थित होत्या . तसेच विभागीय समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ, सिद्धार्थ गायकवाड, सक्षमचे पदाधिकारी दारव्हेकर, नागपूर महानगर पालिकेचे क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, बालरोग तज्ञ डॉ. उदय बोधनकर आणि शंकरनगर मूक बधीर विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मीनल सांगोळे, सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदे याप्रसंगी उपस्थित होते .
दिव्यांग मुलामुलींच्या विविध स्पर्धेमध्ये अबोली जरित (प्रथम) प्रवीण मिश्रा (द्वितीय) तर कु.शबाना यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. एकल नृत्य स्पर्धेमध्ये सृष्टी बेडेकर (प्रथम) कार्तिक नागुलवार (द्वितीय) तर अन्नन्या थुटे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दिव्यांग मुलामुलींच्या वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती ज्यात अनुक्रमे सागर मेश्राम (प्रथम) यशस्वी बोरकर (द्वितीय) आणि कल्याणी बागडे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाच्या शेवटी मूक बधीर विद्यालयच्या मूक बधीर विध्यार्थ्यानी उत्कृष्ट वेशभूषा करून संचलन केले