मनपा.. १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम करणार
नागपूर : पश्चिम नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूर च्या पाणीपुरवठया मध्ये सुधारणा करण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने, केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत सेमिनरी हिल्स ते गांधीनगर टी -पॉईंट पर्यंत १००० मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून पूर्णत्वास अग्रेसर आहे.
नमूद कामांतर्गत सेमिनरी हिल्स मुख्य जलकुंभ (MBR) ते सीपीडब्ल्यू क्वार्टर्स पर्यंत एकूण ६०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम शिल्लक असल्यामुळे संबंधित सर्व विभागांच्या परवानगी आणि वाहतूक विभागाची परवानगीनुसार दिनांक १ ऑगस्ट २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ पर्यंत वरील नमूद काम करण्यासाठी सेंटर पॉईंट शाळा ते टीव्ही टॉवर चौक, सेमिनरी हिल्स रास्ता वाहतुकी करीत बंद करण्यात येणार आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.