नवी दिल्ली : तुमचा चोरी गेलेला किंवा हरवलेला मोबाईल फोन आता तुम्हाला सहज शोधता येणार आहे. सरकार 17 मे पासून एक नवीन ट्रॅकिंग सिस्टम सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) लाँच करणार आहे.
या ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लोक त्यांचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधू शकतील किंवा तो ब्लॉक करू शकणार आहे. सीईआयआरच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या वर्षी मार्चमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाचणी आधारावर ही सिस्टम सुरू करण्यात आली. सीडीओटीचे अध्यक्ष राजकुमार उपाध्याय यांनी यासंदर्भात माहिती दिली.
स्मार्टफोन वापरकर्ते त्यांचा हरवलेला फोन CEIR वेबसाइट किंवा KYM (Know Your Mobile) अॅपद्वारे ब्लॉक करू शकतो. ही सिस्टिम तयार आहे आणि येत्या तीन महिन्यात संपूर्ण भारतात (India) लाँच केली जाईल.भारत सरकारने इंटरनॅशनल मोबाईल (Mobile) इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) उघड करणे आधीच बंधनकारक केले आहे. या प्रकरणात मोबाइल नेटवर्कमध्ये आधीपासूनच IMEI क्रमांकांची सूची असेल.
CEIR च्या अधिकृत वेबसाइटनुसार, या सिस्टिमद्वारे आतापर्यंत 4,77,996 फोन ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 2,42,920 फोन ट्रॅक करण्यात आले आहेत. त्याच वेळी, 8,498 फोन शोधून काढले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत 1.28 कोटी रुपयांचे 711 फोन जप्त केले आहेत. सीईआयआर वापरून पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत हे सर्व फोन जप्त केले. त्यानंतर हे फोन त्यांच्या मालकांच्या ताब्यात देण्यात आले.