– सदर कर्मचारी न.प.च्या आस्थापनेवरील नाहीत ! इंदिरा चौधरी-प्रशासक
वाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने न.प.वाडी येथील कंत्राटी महिला सफाई कामगारांच्या न्याय हक्कासाठी वाडी स्थित अमरावती महामार्गावरील भाजी मंडी चौक सुरू केलेल्या उपोषणाला आठ दिवसाचा कालावधी लोटून गेला परंतु अद्याप प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही.परंतु जोपर्यंत या महिला सफाई कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचे मनोगत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
याआधी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी,कामगार आयुक्त,प्रशाकीय अधिकारी यांना कामगारांच्या या समस्याबात चर्चा करून न्याय मिळावा यासाठी मागणी केली.कामगार मंत्री बच्चू कडू यांनाही स्पीड पोस्ट द्वारे निवेदन पाठविले असल्याचे सांगितले.
या महिला सफाई कामगार मागील सहा वर्षांपासून न.प.वाडी येथे कंत्राटी पद्धतीने सफाई मजूर म्हणून काम करीत आहेत.दरम्यान त्यांना किमान वेतन मिळत नाही,भविष्य निर्वाह निधीचे खाते नाही,दवाखान्याचे कार्ड नाही,कर्तव्य दरम्यान सतत कामगारांचें शोषण सुरू आहे.अशातच १४ सफाई महिला कामगारांना कामावरून काढल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.काही महिला कामगार विधवा असल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.न.प.वाडी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले.परंतु अजून पर्यन्त काहीही ठोस कार्यवाही झाली नाही.
या उपोषण मंडपाला मनसे कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक सह मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी,जिल्हाध्यक्ष सतीश कोल्हे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांच्या समस्या ऐकून घेतल्या.उपोषणाला तालुका संघटक दिपक ठाकरे,तालुका अध्यक्ष अनिल पारखी यांच्या नेतृत्वात संदीप माने,अश्विन कोडापे,ओंकार तलमले, सूरज भलावी,वैभव तुपकर,अजिंक्य वाघमारे,मुकेश मुंडले,नितीन पिठोरे,हरिभाऊ शेलोटे,भारत ठोबंरे,अश्विन रामटेके,सागर कामडीकर,आकाश रामटेके,वेदांत रहांगडाले,अमोल सोंनसरे,आशिष जांभूळकर,पंकज धिरडे,दिलीप टापरे,स्वप्निल शेडामे,महादेव शेळके,सागर बागडे,अक्षय मगर, सुमन झा,व महीला कांमगार सुलका मारबते,आशा भवरे,अल्का सुदामे,शारदा सुखदेवे,उज्वला दुपारे,जया गायकवाड,प्रमिला पारधी,निशा लोखंडे, अंजली जनबंधू,स्मिता सोनवणे,चंपा पंधरवार,
रेश्मा लोणारे,राधिका ठाकरे,अनुसया कुमरे उपस्थित होते.