नागपूर : शहरातील धामणा येथे चामुंडा नावाच्या दारू गोळा बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली.यात सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये पाच महिलांसह एका पुरुषाचा समवेश आहे.
माहितीनुसार, गुरुवारी 13 जून रोजी दुपारी दीड च्या सुमारास हा स्फोट घडला.हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबत अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी आता कंपनीच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली.
या घटनेनंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांचे सत्वन करत आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही दिले. पीडित कुटुंबीयांना सरकारकडून 10 लाख आणि कंपनीकडून 25 लाख रुपये मिळतील, असेही ते म्हणाले.
तसेच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील घटनास्थळी दाखल घेत घटनेचा आढवा घेतला.
दरम्यान संपूर्ण प्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कारखान्याकडून 25 लाख रुपये, शासनाकडून 10 लाख रुपये आणि पीडित कुटुंबीयांना मासिक 20 हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी केली आहे.