Advertisement
नागपूर: उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपुरात येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
=हवामान खात्याने नागपूरसह भंडारा आणि गडचिरोलीसाठीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तिन्ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची चर्चा आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होतांंना दिसत आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली असली तरी नागपुरात मात्र मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नागपुरात पावसाने दडी मारल्याने उष्णतेपासून अजूनही दिलासा मिळालेला नाही.
आता हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.