Published On : Wed, Nov 29th, 2023

नागपुरात अवकाळी पावसाची शक्यता ; दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी

Advertisement

नागपूर : मागील तीन दिवसांपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

नागपूर जिल्ह्याकरिता हवामान खात्याने २९ व ३० नोव्हेंबरसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे. विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवामान खात्यानुसार विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे.

Advertisement

दोन दिवसांपासून विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे थैमान पाहायला मिळाले. मंगळवारी नागपूर जिल्ह्यात सकाळपासूनच “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला होता. यादरम्यान जिल्ह्यातील काही भागात गारपीट तर काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने आज आणि उद्याही नागपूर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” दिला आहे. यादरम्यान वीज गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.