Published On : Tue, Jun 25th, 2024

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांच्या निलंबन कारवाईच्या अंतरिम स्थगितीला हायकोर्टाचा नकार

Advertisement

नागपूर: राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी चाैधरी यांच्याविरुद्धच्या निलंबन कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.

सुभाष चाैधरी यांच्यावर विविध प्रकारची अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत कुलपती रमेश बैस यांनी चौधरी यांना ८ मे २०२४ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर १३ जून रोजी दुसरी नोटीस बजावून प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. या कारवाईविरुद्ध चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.यावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता. तो निर्णय मंगळवारी जाहीर केल्याने सुभाष चौधरी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement