Published On : Tue, Jul 7th, 2015

चंद्रपूर (सिंदेवाही) : नियोजनाअभावी कृषी उत्पन्न बाजार समित्या कुचकामी ?

 

  • शेकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळविण्याकरिता बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली
  • व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविली
  • शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची कमतरता

सवांददाता/ अमृत दंडवते  

चंद्रपूर (सिंदेवाही)। शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा त्यानी घेतलेल्या उत्पन्नाची चांगली परतफेळ मिळावी यासाठी आणि इतर कृषी उत्पन्नाची खरेदी विक्री होण्याच्या हेतूने बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. योग्य नियोजन नसल्यामुळे बरेचश्या बाजार समित्या भुईसपाट झाल्याचे चित्र दिसते.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चंद्रपूर जिल्हा हा भात पिकांच्या उत्पन्नासाठी संपूर्ण महराष्ट्रात नावाजलेला आहे याच जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात एच.एम.टी जातीच्या भात पिकाचा जन्म झाला. आता हा एच.एम.टी भात सात समुद्रा पार पोहचला आहे. पण इथल्या बाजार समित्या जिथल्या तिथे असल्याचे दिसते. कारण एकच नियोजन कमतरता.

चंद्रपूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात सिंदेवाही तालुका येतो या ठिकाणी वाहतुकीचे सर्व साधने उपलब्ध आहे बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदि मुलभूत सुविधांनी सुसज्य असे वातावरण सिंदेवाही क्षेत्रात आहे. सोबतच शेतकरी वर्ग बऱ्याच प्रमाणात असुन एवढ्या सर्व गरजा हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा सिंदेवाहीची बाजार समिती या व्यापारी करणाच्या शर्यतीत बरीच मागे पडलेली आहे.

आपल्या भुमी पुत्राला नाविन्यपूर्ण आणि वेगवेगळे उत्पादन घेता यावे त्यांच्या मालाला उत्पादन दर्जा वाढवा यासाठी जवळच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे भात संशोधन केंद्र पण आपल्याकडे आहे. एवढ्या सर्व गरजा असून सुद्धा आज सिंदेवाहीच्या बाजार समितीची दयनीय अवस्था आहे. ही फार मोठी शोकांतीका आहे जो पर्यंत शेतकरी आपल्या मालाला बाजार समितीत नेणार नाही तोपर्यंत त्याच्या मालाला योग्य भाव मिळू शकत नाही असे जानकारांचे मत आहे. शेतकरी आपला माल बाजार समितीत नेतील तेव्हा तेथे अनेक व्यापारी खरेदीच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे सहजिकस शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळू शकते. पण आजकाल सर्वत्र पाय पसरविलेल्या दलाली मुळे शकते. शेतकरी दलालाकडे जास्त भाव मिळतो हि चुकीची कल्पना करू लागला आहे. याचा पुरेपुर फायदा दलालानी घेतलेला आहे. म्हणून आज सगळीकडे दलाली फोफावत आहे आणि व्यापारीकरण हळूहळू कमी चालले आहे. याचा आर्थिक आणि व्यापारी फटका कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आणि शेतकऱ्यांना बसत आहे. आज शेतकरी वर्गामध्ये जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. तेव्हाच यातून मार्ग निघून बाजार समित्यांचे आणि शेतकर्याचे भले होईल असे दिसते. त्यासोबतच शेतकऱ्याची वजन मारून फसवणूक करणाऱ्या दलालांना त्यांची जागा दाखविणे फार गरजेचे झालेले आहे असे दिसते.

जो पर्यंत शेतकरी आपल्या मालाला बाजार समितीकडे विक्रीकरिता आनणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळू शकणार नाही रासेच व्यापारी वर्गानेसुद्धा आळ मार्गाने शेतकऱ्याचा माल खरेदी न करता त्यांना बाजार समितीत माल नेण्यास उत्साहित करावे तेव्हा शेतकरी आणि व्यापारी यांच्यात थेट भाव बाजी होऊन त्याच्या मालाला योग्य भाव मिळेल असे मत मधुकर भगत प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदेवाही यांनी व्यक्त केले आहे.
Krushi Utpann Bazar Samiti

Advertisement