Advertisement
नागपूर: नागपूरच्या निरी मार्गावर झालेल्या हत्येतील व्यक्ती प्राचार्य मोरेश्वर वानखेडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी ही हत्या झाल्याचे उघड झाले होते. वानखेडे चंद्रपूर शहरातील तुकूम भागात असलेल्या कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य रूपात कार्यरत होते. ते नागपुरात स्थायिक होते आणि नागपूरहून ये-जा करत असत.
गेली ९ वर्षे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न या मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते काम बघत होते. त्यांच्या हत्येमागचे कारण मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी यासंबंधी तपास सुरु केला असून प्राचार्य वानखेडे यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे.