लतादीदींच्या निधनाने संगीत क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला खऱ्या अर्थाने अजरामर केले. लतादीदींचे हे योगदान कधीही विसरता येणार नाही, अशा भावना माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.
लता दीदींच्या जाण्याने एका स्वर्णीम युगाचा अंत झाल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. दीदींच्या योगदानामुळेच भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक पाटलावर कीर्ती प्राप्त झाली. त्यांचे योगदान भारतीय लोक कधीही विसरू शकणा नाही. संगीतसाधनेचा दाता आपल्यात नाही, ही कल्पनाच करणे अशक्य असल्याचे बावनकुळे म्हणाले.
सामान्यांच्या भावनांची वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य दीदींच्या संगीतात होते. अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना त्यांच्याच संगीतामुळे बळ मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती त्यांनी अखेरपर्यंत श्रद्धा जपली. दीदींचा आवाज पुन्हा कधीही ऐकता येणार नसले तरी तो स्वर अमर आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.